Ad will apear here
Next
‘हुजपा’मध्ये मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन साजरा


हिमायतनगर :
हिमायतनगरमधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये  मराठवाडा मुक्तिदिन आणि विद्यापीठ वर्धापनदिन संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

या वेळी प्रा. डॉ. वसंत कदम म्हणाले, ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. सगळीकडे स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकत होता; पण मराठवाड्यात निजामाच्या फर्नाणानुसार तिरंगा ध्वज फडकवण्यास बंदी घालण्यात आली होती. अशा निजामाच्या अन्यायी व हुकमी राजवटीच्या विरोधात हैदराबाद संस्थानातील जनतेने सशस्त्र लढा उभारला. त्यामुळेच १७ सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती पत्करली व मराठवाडा मुक्त झाला. म्हणून १७ सप्टेंबर १९४८ हा मराठवाड्याचा खरा स्वातंत्र्यदिवस आहे.’

या वेळी मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रभाकर मधोळकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला के. सदावर्ते, मुख्याध्यापिका श्रीमती खंबायतकर, उपप्राचार्य डाके सर, ज्येष्ठ नागरिक शक्करगे, द. ल. मुधोळकर, दिलीप पाटील-लवरेकर, आकलवाड सर, वराडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शेख शहेनाज, सदस्य प्रा. मुकेश यादव, प्रा. गजानन दगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शेख शहेनाज यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. गजानन दगडे यांनी केले. या वेळी कन्याशाळेचे व कनिष्ठ तथा वरिष्ठ  महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNYBS
Similar Posts
हुजपा महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे (एनएसएस) २० डिसेंबर २०१८ रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
ईव्हीएम, व्हीहीपॅट मशिनचे ‘हुजपा’मध्ये प्रात्यक्षिक हिमायतनगर : शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी २०१९ रोजी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. केलेल्या मतदानाची पावती दाखविणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचेही प्रात्यक्षिक या वेळी दाखविण्यात आले
‘हुजपा’मध्ये हिंदी दिन साजरा हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आणि हिंदी साहित्य मंडळ व हिंदी विकास कौशल मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
‘हुजपा’ महाविद्यालयात मतदार जनजागरण रॅली हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी सकाळी मतदार जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language